कोणी मत देतो का रे मत (koni mat deto ka mat) by ganesh puri

पक्षाचे झेंडे हातात घेऊन
मनभर आन पोटभर जेऊन

फॉर्म भरायला सोबत येऊन

कोणी मत देतो का रे मत मला सांगा

 

विकासाच्या देऊन आशा

जागवून लोकाच्या अभिलाषा

येऊ मी निवडून कसा

कोणी मत देतो का मत रे मला सांगा


 
सागा फक्त मला तुम्ही एक

विकास होईल तेंव्हाच नेक

टाका पाकिटात एक नोट

कोणी मत देतो का मत रे मला सांगा

 

असेच येतील निवडून सारे

फिरतील घोषणांचे वारे

द्या अशांनाच निवडून पुन्हा रे

कोणी मत देतो का मत रे मला सांगा


जर हि पोस्ट आपल्याला आवडली तर नक्ककी कमेंट करा आणि शेअर करा..

गणेश पुरी सिमनगावकर 

परभणी 

९२८४०६४६७३

purigno.01@gmail.com 


आपल्याला  हे नक्की आवडेल 

जेंव्हा देव कोपला(JENVHA DEV KOPALA) BY GANESH PURI

चौकड़ी (CHAUKADI) BY GANESH PURI

 

Ganesh puri

I AM A BLOGGER WEB DESIGNER SEO SPECIALIST CAPTIONIST POET GRAPHIC DESIGNER LOGO DESIGNER AND WRITER.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने