झोपित असताना रोज दररोज
घेऊन अति उत्साह मेघराज बरसला
हातातला घास आज हातातच राहिला जेंव्हा देव कोपला
बी बियाणे , खत आणि फवारणी
गेले सारे विनाकरणी केली नाही कोणी करणी
तरी आले भरणे नशिबी जेंव्हा देव कोपला
सगळीकडे पाणीच पाणी
त्यात अनवाणी ढोर बनुनी तो फिरला
शिल्लक फक्त उरले पाणी पाणी जेंव्हा देव कोपला
सरकार देई आश्वासन उबले आता मन
विरोधी पक्ष ही करतो प्रन
म्हणती घाबरु नका रे पण घाबरायचेच काय ग जेंव्हा देव कोपला
आज जरी अंधार आहे घरात माझ्या
उद्या तरी होईल नवी सकाळ आहे भरवसा
पण उद्या पाहण्यास राहू तरी कसा जेंव्हा देव कोपला
जर हि पोस्ट आपल्याला आवडली तर नक्ककी कमेंट करा आणि शेअर करा...
गणेश पुरी सिमनगावकर
परभणी
९२८४०६४६७३
purigno.01@gmail.com
आपल्याला हे आवडेल .