विचारतो तुला मी पुन्हा पुन्हा
का माझ्याच पदरी लखलखते अंगार
जीवनात आहे का फक्त अंधार -अंधार
पावलोपावली दुःख आणि विवंचना
प्रत्येकक्षणी दुर्दैवाशी सामना
नशिबावर आतातर विश्वासच नाही
प्रयत्नही करू किती माहीत नाही
अखेर झालेले सारे नशिबावर ढकलन
काट्यावरूनही अगदी हसत चलन
अखेर कुठपर्यंत जपावी ही उद्दाम इच्छाशक्ती
थकलेल्या हारलेल्या मनाला किती करू सक्ती
आतातर इच्छेचाही अंत लागला व्हायला
आतातरी सांग न देवा त्या सटवीला
थोडं चांगलं नशीब लिहायला
आपल्याला आमची हि पोस्ट आवडली तर शेअर नक्की करा
गणेश पुरी सिमनगावकर
९२८४०६४६७३
gspindiablogs@gmail.com
gspindiablogs@gmail.com
आपल्याला हे आवडेल
