तू सुखी राहा


पण तू मला वाचन दिल होत 
मी उत्तराची वाट पाहतोय आताही
अखेर मी ही माणूस आहे थकलोय
आन निर्णय घेतोय अगदी टोकाचा 
फक्त तुझ्यासाठीच मी मान अपमामानाची पर्वा केली नाही 
कितीही टोचून बोलले आप्त तुझे तरी शांत होतो 
राग तर येत होता पण तुझ्यासाठी सारा गिळला 
कदाचित तुलाही आवडल नसेल ते पण काय करणार तू 
तू सोबत आहेस लहान होतीस तेंव्हापासून
माझा अपमान करून व मला झुगारून 
तुझे आप्त मला दूर करू शकत नाहीत
पण तू हार म्हणालीस इथं
आणि दूर झालीस माझ्यापासून कायमची 
हे आयुष्यातलं का पान मी कधीच फाडणार नाही 
आणि उलघडूनही बघणार नाही 
आठवणी तर जपाव्या  वाटतात तुझ्या पण 
होतो त्रास काही विसराव वाटत सार 
पण खरच तू नाहीस विसारण्यासारखी
पण एक तरी काळ येईल की मी तुला विसरेल
तेंव्हा तेंव्हा जागव स्वप्नात येऊन मला 
तू नाहीस तर काय झालं कदाचित 
तुझ्या स्वप्नानेच आपलं प्रेम अजरामर होईल
तिथेतरी साथ देशील अगदी मरेपर्यंत
विसर मला 
आता बस्स तू सुखी राहा...


गणेश पुरी  सिमनगावकर
gspindiablogs@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने