आज मी बोलणार



आयुष्य सार गेलं समजण्यात 
काळही बदलला सावकाश 
आज ती ना माझी न मी तीचा
तरीही आज मी बोलणार


ती होती  जोवर काळ होता
ती गेली तेंव्हा काळहि गेला
आज तिच्याशी संबंध नाही
तरीही आज मी बोलणार 

उभ आयुष्य देणार होतो 
पण तू फुटबॉल असा केला की आजही 
मी उठतो अर्धरात्री रडतो स्वप्नातुन
तरीही आज मी  बोलणार 

तुझ्यावर जीव होता आणि विश्वासही
त्यामुळेच तुला कधी बोललो नाही 
तू गेल्यावर विश्वासही मेला आणि जीवही गेला 
तरीहि आज मी बोलणार

नेहमी भीती वाटायची कारण 
मैत्री तुटन मान्य नव्हत विनाकारण
आता तुझा माझा रस्ता वेगळा आहे
तरीही आज मी बोलणार


आज तू सुखी असशील तीथे
आणि मीही विसरलो असेल इथे
तुझ्या जुन्या जखमांना ताजे करून
तरीही आज मी बोलणार


गणेश पुरी  सिमनगावकर
gspindiablogs@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने