चालत चालत ओझं वाहायच सौंसाराच
जळत रहायच चुलीतल्या लाकडांसारखं
दुसऱ्यांची काळजी घ्यायची
अन स्वतः अर्धीच खायची
आयुष्य यालाच म्हणतात का कोण जाणे
ओट्यावर बसणारा श्वान दिवसभर उपाशी राहतो
अर्धीच होईना का पण सुखाने खातो
पण याला तर अपुरे आहेत 24 घंटे
म्हणून हा अर्ध्या झोपानेच राहतो
आयुष्य यालाच म्हणतात का कोण जाणे
बाहेर फिरत असताना उन्हात चटके बसतात
कारण पायाला तळवेच शिल्लक नसतात
उद्या घेऊ की अस मन सांगते
अन चटके ही गरिबीला नमन करतात
आयुष्य यालाच म्हणतात का कोण जाणे
मुलगा म्हणतो तुम्ही काय केलं
बायको म्हणते तुम्ही काय केलं
मलाच समजेना मी काय केलं
अस जगणं अस तर त्या परमेश्वरानेच देल
आयुष्य यालाच म्हणतात का कोण जाणे
गणेश पुरी सिमनगावकर
gspindiablogs@gmail.com
gspindiablogs@gmail.com
Tags:
गणेश पुरी च्या कविता
