अहिंसेचा बंदर(ahinsecha bandar) by ganesh puri


आज मनातलं मी पूर्ण केलय 
अहिंसेच्या तीन बंदराना केंव्हाच दूर केलंय
पूर्वी मी होतो शांत सुस्वभावी होतो 
बोललं जे ते सहन करत होतो 
स्वतःलाच महान समजत होतो 
एक गालात मारली की दुसरा पुढे करायचो 
किती बी बोलला वंगाळ तरी कुणालाच नाही नडायचो
काही जण माझा मान करत होते
पण लपून शब्दांचे वार करत होते
अहिंसेच्या पुजाऱ्याला ते फुलाचं भासत होते
अन्याय होतच होता मानही आता दिसत होता
आता स्पष्ट दिसत होता फोलपणा अहिंसेचा
कदाचित यानेच हिनवणाऱ्यांना प्रोत्साहन मिळत होते 
अन ते आणखी अन्याय करत होते हिनावत होते चिडवत होते
अखेर झाला विद्रोह अन सबुरीचा बांध तुटला
जो खात होता गालावर आजवर तो देत सुटला
आता अहिंसा पाळत नाही 
म्हणूनच तर दुनिया मला जाळत नाही 
एक सांगू का,
अन्याय सहन करण्याला अहिंसा म्हणत नाहीत
 लढल्याशिवाय माणसं कधीच जिंकू शकत नाहीत
शंभर दिवस जगणे कामाचे काय
अभिमानाने जगायचे असेल तर वाघ बनण्यात गय काय


गणेश पुरी  सिमनगावकर
gspindiablogs@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने