नजर हि ना लागो कुणाची रे तुला
याजसाठी काजळटीका तुला शिवनेश्वरा
लावण्यखाणी तुझी मूर्ती मला दिसली
रगरगत्या मनात शांती आज जाहली
दे आशीर्वाद मला तू गातो लेकरा
याचसाठी काजळटीका तुला शिवनेश्वरा
पाषाणाच्या मूर्तीमधी परमेश्वर दिसला
भक्तांच्या या भक्तीसाठी देव अडकला
मानो कोणी नाही मानो मानतो मी तुजला
याजसाठी काजळटीका तुला शिवनेश्वरा
स्वप्नी मजला नीलकंठ दिसतो
गळ्यामध्ये नागराज शोभतो असा
हातामध्ये त्रिशूल डमरू मस्तकी हा भस्म साजरा
याजसाठी काजळटीका तुला शिवनेश्वरा
गणेश पुरी सिमनगावकर
gspindiablogs@gmail.com
