चौकड़ी (chaukadi) by ganesh puri

chaukadi

 

त्या दिवशी पारावर अशीच चौकडी जमली 

काहीतरी वाद हवा अशीही म्हणली

मलाही खूप इट्रेस आला म्हणून मीही बसलो 

दाखवत नव्हतो पण मी हसलो 

वाद झाला सुरु नव्हत समजत

कुण्या बाजूनी वाढेल जनमत 

मुद्दा निघाला भारत-पाकिस्तानचा 

एक म्हणाला भारताने बॉंब टाकावा 

 सगळा किस्सा दिवसातच संपवावा 

दुसरा सांगु लागला मग भारत कसा महान 

कसे फडकले लाल किल्ल्यावर तिरंगी निशाण

पण मी त्याला मध्येच टोकले 

सर्व स्तब्ध होऊन ऐकू लागले 

मी म्हणालो त्यांना भारत होता महान 

पण तुमच्या - माझ्यासारख्यानीच याला केले घाण 

कधी करतो आपण जातीय दंगे 

आपल्याच भावा बहिणीशी घेतो पंगे

पुस्तकावर पुस्तक वाचून आपुन झालो मोठे 

पण पहिले पानच वाचले नाही ज्ञानाला केले खोटे 

फोडतो आपलीच संपती करतो लुट 

आपल्यातल्या आपल्यातच करतो तुटा-तुट 

मुस्लीम काय अन हिंदु काय 

रक्त पहा सर्वांचे सारखेच हाय 

जर लढायाचय पाकीस्थानशी 

तर प्रथम लढा स्वतःशी 

आरक्षण - आरक्षण तुम्ही मागता 

अन वरवर भारताला महान म्हणता 

भारत महान होईल पण आपण सुधारल्यानंतर 

मग पाकीस्थान काय अन जग काय विजय होईल सर्वांवर 


swarnakshari

कवी :गणेश पुरी सीमनगावकर 

९२८४०६४६७३

purigno.01@gmail,com

कविता कशी वाटली मला कमेंट मधून कळवा

आणि माझी पोस्ट शेअर नक्की करा 


आमच्या इतर पोस्ट देखील तुम्हाला आवडतील 







Ganesh puri

I AM A BLOGGER WEB DESIGNER SEO SPECIALIST CAPTIONIST POET GRAPHIC DESIGNER LOGO DESIGNER AND WRITER.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने