🙏डोंगरएव्हढं प्रेम🙏
जीवनातील माझे प्रेम त्या बागेसारखे होते
त्यात गुलाबाची फुले खूप होती
पण त्यातील तेच फुल मला आवडले
जे मी सगळ्यात अगोदर होते निवडले ।।धृ।।
त्याच फुलाची आशा ठेवून
मी बागेपासून दूरावलो
फुल जागीच मला दिसणार
यासाठी मी खूप अतुरलो।।१।।
नशीब माझे होते
लिहिणारा मात्र देव होता
त्यास विचारले मी हे तू काय केले
तो सरळ मला म्हणाला
अरे तुझे नशीब बाबा मी नाही लिहिले ।।२।।
ते फुल होते
पण पहिल्यासारखे
कोवळे लसलसीत नव्हते
म्हणून मन माझे
त्या देवावरच रुसून बसले।
।।३।।
देवा प्रेम दिलेस
त्यात आशाही दिलीस
जे दिलं ते इथंच दिलं
पण जे द्यायचं नव्हतं
त्याची अपेक्षा का दिलीस। ।।४।।
ज्या यशपर्यंत तुला
जाऊ द्यायचं नव्हतं मला
त्या वाटेवर तरी का
पाठवलेस तू मला।।५।।
तो नुसता हसू लागला
मला म्हणू लागला
बाळा हेचं तर खरं जीवन असतं
जे हवं ते मिळतं नसतं
आणि तेच मिळतं जे आपल्याला नको असतं
ते ही विनाकारण।।६।।
पण जीवन जगण्याचा
आधार असावा म्हणून
हे सगळं दिलेलं असतं
जस आभाळाचं आणि
जमिनीचं एकमेकांवर खूप प्रेम असतं
पण ते कधीच अस्तित्व होत नसतं, ते कधीच अस्तित्व होत नसतं।।७।।
हि पोस्ट आपल्याला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की कळवा
आमची हि पोस्ट आवडली तर शेअर नक्की करा .
आपलाच कवी- शिवश्री प्रल्हाद विश्वनाथराव बोडखे पाटील
मो क्र.९०१११०९०३१/ ९८३४४४२५००
ई-मेल-pralhad.k71@gmail.com
आपल्याला हे आवडेल
