कालचा दिवस खरच खूप सुखद होता
खूप दिवसांनी तुला पाहिलं आणि
अश्रू अनावर झाले दुःखाचे नाही सुखाचे
कथा तर तशा खूप आहेत
तुझी माझीही त्यातलीच एक
पण इथं ना खलनायक होता
ना कुणाचा विरोध पण
शेवटपर्यंत तू मला बोलायची राहिलिस
आणि मी तुला राहिलो बोलायचा
त्या व्यतिरिक्त ना जाणे किती बोललो
पण गूढ ते गूढच राहिले
आणि काल पुन्हा तुला पाहिले
कालचा दिवस खरच खूप सुखद होता
नाही का....
जर हि पोस्ट आपल्याला आवडली तर नक्की कमेंट करा आणि शेअर करा...
गणेश पुरी सिमनगावकर
परभणी
९२८४०६४६७३
purigno.01@gmail.com
गणेश पुरी सिमनगावकर
आपल्याला हे आवडेल .
