आग झाली
केविलवाणी ती
मूक प्राणी झाली
भास माझा खोटाच होता
शेवटी वणवा पेटलाच नव्हता।।धृ।।
आवाजाचा काहूर उठला
दाही दिशी कल्लोळ माजला
आकाशी पक्षांनी भरारी घेतल्या
पिल्लांसाठी काही चिमण्या दबून बसल्या
स्पर्श त्यांना आगीचा नव्हता
शेवटी वणवा पेटलाच नव्हता।।१।।
नुसती धांदल
जंगलाची उडाली
झोपलेल्या महत्वकांक्षेला जाग आली
जिद्द गगनाला भिडाया गेली
ना इकडे ना तिकडे
ती जागीच पडली
अंदाज माझा खोटाच होता
शेवटी वणवा पेटलाच नव्हता।।२।।
माझ्याच मनाचा भोळा भाव होता
गोंधळ त्याचा पार उडाला होता
तिकडून काहीच प्रतिसाद नव्हता
एकटाच पुटपुटत उड्या मारत होता
जंगल स्वतःला समजत होता
तिच्या प्रेमाला वणवा मानून
ठिणगी जेव्हा पडली होती
तेव्हा वर्षाराणी बरसली होती ।।३।।
आस होती वणवा पेटण्याची
तीही जागीच राख झाली
एकटाच अखेर सोबती राहिला
ना सहवास त्यास कुणाचा लाभला
खरचं मनाचा तो भास होता
शेवटी वणवा पेटलाच नव्हता
शेवटी वणवा पेटलाच नव्हता ।।४।।
आपलाच कवी- शिवभक्त प्रल्हाद विश्वनाथराव बोडखे पाटील
भंगापूरकर
९०१११०९०३१/७७१९९६७१४३
