अस्तित्वता महाराष्ट्राची(maharashtrachi asmita)by shivbhakt bodkhe


सुरक्षित नाही लेक सहा वर्षाची
ग्लानी सरकारला आली की
बलात्कार होतो भर दिवसा
फडवणीस साहेब सांगांना तुम्हची झोप झाली का ? ||धृ||

दुष्काळामुळे बाप घेतो फाशी
विचाराणा चित्यास अग्नी मिळाली का ?
नुसती दुष्काळग्रस्थाची यादीचं जाहीर होते
सांगाना या जन्मात तरी तुम्हचा अभ्यास पूर्ण होईल का ?||१||

फुले,आंबेडकर, शाहू , शिवराय
अख्या हिंदुस्तानाचे, दैवत आम्हूचे
त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या हिजड्या छिंदमला
अजून तुम्हच्या पक्षात जागा आहेच का ?||२||

धनगर ,मुस्लिम,मराठा आरक्षणाचा
विषय महत्वाचा तुमच्यासाठी नाही का ?
४२ मावळ्यांनी दिले बलिदान यासाठी
त्यांच्या घरच्यांना सरकारी नोकरी आणि दहा लाख रुपये देणार हे ध्यानात तर आहे का ?||३||

अश्वासनाच गाजर तुम्ही
आता दाखवणं बंद कराल का
सत्तेत तुम्ही फार माज केला
आता तरी खुर्ची सोडाल का?||४||

नाही होणार तुम्हच्याच्यानी
तर सरळ सरळ सांगाल का
गुन्हेगारी माजलेल्या या पाच वर्षात तरी
सांगाना झोप तुम्हची झाली का?||५||

पटेलांचा जगात एक नंबर पुतळा झाला
शिवरायांचे स्मारक विसरलात का
आशीर्वाद शिवछत्रपतींचा होता
म्हणून मुख्यमंत्री झालात याचा विसर पडला का ?||६||

शेतकऱ्यांची खूप पिळवणूक केली
मान हलवन आता बंद कराल का
स्वतःला हिंदू म्हणवून जातीय दंगली घडवीण
आता तरी हे थांबवाल का?||७||

सुरक्षा द्या आम्हच्या लेकी बाळींना
गृहखाते अजून कडक कराल का
कायदा विकणाऱ्या सरकारी गुंडांना 
आता तरी त्यांची लायकी दाखवाल का?||८||

झोप झाली असे समजून 
अंतकरणातून आवाज देऊ का
फडवणीस साहेब तोच प्रश्न पुन्हा विचारतो 
आता तरी तुम्हची झोप झाली का?||९||


कवि
शिवभक्त प्रल्हाद विश्वनाथराव बोडखे
 पाटील
भांगापूरकर
मो.नं.९८३४४४२५००/९०१११०९०३१

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने