भरलेला की संपलेला अर्धा उत्तर मागतो
कालानुरूप बदलणाऱ्या नजरांचे
यश नाही अपयशाचे
मनात दडलेले ते दुःख
पण खरंच विचार केला तर आनंद आहे
जन्मता मिळणारा चांदीचा चमचा
चाकरी करणारा हाजी चमचा
प्रयत्नांती अपयशी नशिबाचे
आणि गरिबी लाचारीचे
मनात दडलेले ते दुःख
पण खरंच विचार केला तर आनंद आहे
कपड्याला फाटक्या छिद्र किती
शुभ्र पांढऱ्या कपड्यांची कीर्ती
पण इमानदारीच्या फाटकेपणाचे
शुभ्र स्वच्छ बेईमानीचे
मनात दडले ते दुःख
पण खरंच विचार केला तर आनंद आहे
वरवरचं हसू नेहमीच
मनाला समजूत करून घेणं
स्वतःच्या समजूतपणाचे
दुसऱ्यांना समजू न दवण्याचे
डोळ्यात अश्रू आणि मनात ते दडलेलं दुःख
पण खरच विचार केला तर आनंद आहे
गणेश पुरी सिमनगावकर
gspindiablogs@gmail.com
