सत्यता प्रेमाची (satyata premachi) by shivbhakt bodkhe

 

बघाना किती स्वार्थी असतं जीवन 
तेही फक्त काहीजनाचच 
मी म्हणजे तिच्याशिवाय 
एकही क्षण राहू शकत नाही 
आणि ती किती सहजासहजी 
माझ्याविना जीवन जगते 

अस सूत्र नशीबाचच असत 
जे नशिबात नसतात  
त्यांचाच पहिला नंबर 
जीवनाच्या प्रेमात असतो 
आणि ज्यांचा कुठे उल्लेखही नसतो 
पण तेच मात्र आपल्या नशिबात 
आपल्यावर थाटाने हक्क गाजवतात 

किती निराळच असत ना 
हे प्रेमावाचुंचे जीवन 
क्षणोक्षणी जळणारी मनाची अवस्था 
कुणाला दिसत नाही पण तीच
 कुणापासून लपत नाही 

कवी : शिवभक्त विश्वनाथ बोडखे पाटील 
भांगापुरकर 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने