चिमुकल्यांच्याच नशिबी
का अशीही आग रे ,
सरकारी नोकरहो
कधी येईल तुम्हाला जाग रे
राज्याकार्त्यांच्याच दबावाखाली
विकला कायदा आज रे ,
कधी जाईल गुन्हेगारांचा
देवा अशाने माज रे
आई बहिण हि इज्जत आपली
करू नका तिला बेहाल रे ,
गरज भासते क्षणाक्षणाला
शिवरायांची आज रे
जाणीव असुद्या जराशी
होऊ नको इतके षंढ रे
पुन्हा एकदा अन्यायाविरुद्ध
होऊया आपण गुंड रे
माणूस आपण माणुसकीची
जपूया जराशी जाण रे ,
स्त्री जातीच्या संरक्षणाची
घेऊया आपण आण रे
माणूस आपण माणुसकीची
जपूया जराशी जाण रे
स्त्री जातीच्या संरक्षणाची
घेऊया आपण आण रे
कवी - शिवभक्त विश्वनाथ बोडखे पाटील
भांगापूरकर
Tags:
शिवभक्त बोडखे च्या कविता
