वाढदिवस (vadhdivas)by shivbhakt bodkhe



शिखरही त्यापेक्षा कमीच भरेन
त्याहूनही अधिक तुझे यश असेन
नशीब संपले तरीही
तुझे आयुष्य उरेन
लाखो वर्ष उलटली तरीही
तुझा वाढदिवस मी साजरा करेन

तो गुलाबही त्याचा सुगंध
त्या दिवशी तुला देईल
ते फुलपाखरुही तुला
त्याचा सोनेरी रंग देण्याकरता येईल


वर्षानुवर्षे असाच आनंद
तुझ्या वाढदिवसाचा होईल
आणि सहजासहजीच दुखः तुझे
तुझ्यापासून बरेच दूर जाईन

इतके प्रेम तुझ्यावर असूनही
तुला ते कळलेले नाही
तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी
नकळत का होईना तुला
माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही

कवी -शिवभक्त विश्वनाथ बोडखे पाटील
भांगापुरकर 




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने