जीवन दुसऱ्यांचे (jivan dusaryache) by shivbhakt bodkhe


प्रत्येकजण इथे दुसर्यांसाठीच 
धडपड करत असतो 
स्वतःसाठी जीवन 
सहज कुणीच जगत नसतो 

श्वास आपलाच असतो 
त्यावर नाममात्र दुसऱ्याचेच असते 
पैसा आपलाच असतो 
त्यावरही हक्क कुणा दुसऱ्याचाच असतो 

असतं या जंगलाचाही असत 
त्यातील झाडे हि पाखरांसाठी असतात 
आणि ती पाखरेही 
त्या झाडासाठीचअसतात 

त्या जंगलातील अन्न्साखळीही
असाच पद्धतीची असती
 हरणाचे जीवन हे त्यांचे कधीच नसते 
वाघोबाला भूक लागली कि 
लगेच ते हरणांचे प्राण हिरावून घेत असतो 

कवी - शिवभक्त विश्वनाथ बोडखे पाटील 
भांगापुरकर 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने