शुभेच्छा वाढदिवसाच्या तुला (shubhechha vadhdivasachya tula)by shivbhakt bodkhe

सगळेजण तुला काही ना काही 
भेटवस्तू नक्कीच देतील 
आणि जाताना तुला 
वाढदिवसाच्या शुभेच्छा  देऊन जातील 

मन माझं व्याकूळ झालं असेल 
तुला इथे तिथे शोधून 
अगदीच बावरून बसेल 
पण त्याही क्षणी 
मी तुझ्याजवळ नसेल

खरच किती दुर्दैवाची गोष्ट आहे 
डोळ्यांतून माझ्या अश्रू वाहे 
सर्वजण तेवढ्यात तुझं प्रेम आहे 
प्रत्येकजण तुला त्याचं आयुष्य वाहे 

गरज दोनच शब्दांची 
मी बोलणाऱ्या ओठांची 
आणि तू ऐकणाऱ्या कानांची
त्यात या दिवशी आतुरतेची
गोष्ट हि जीवनातील प्रेमाची


कवी -शिवभक्त विश्वनाथ बोडखे पाटील 
भांगापुरकर 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने