स्वराज्य (swarajya)by shivbhakt bodkhe


घडू लागले स्वराज्य 
पुन्हा माझ्या शिवबाचे 
वाट लावली त्या दुष्टांची
घडविला इतिहास पुन्हा सत्याचा... 

धर्म माझा सुरूच होता 
 श्वासातील त्या क्षणासारखा
कर्मही माझे जागेच होते 
त्या जाग्या झाडासारखे...   

भिडू लागली नजर पुन्हा का 
गगनावढया गडाला आता 
बिलगून गेले श्वास माझे 
संपेना का प्रवाह माझा ..

अपेक्षा सगळ्या भरभरून
 पुन्हा पूर्ण होऊ लागल्या 
ईश्वर भक्ती होती म्हणून 
सत्याचाच विजय यात झाला ....

कवी - शिवभक्त विश्वनाथ बोडखे  पाटील 
भांगापुरकर 





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने