नजर त्या एकांताची
तुझ्या ण माझ्या
अबोल अशा प्रीतीची
अजूनही स्वप्न पाहत होती
झोप त्या रात्रीची
आकाशांतील चांदोबाची
प्रीत त्याची अन चांदणीची
अजूनही गोड वाटत होती
सकाळची ती सत्याची
सुरुवात करणाऱ्या तुझ्या
हसऱ्या त्या चेहऱ्याची
अजूनही प्रीत ती आवडत होती
मिचमिचणाऱ्या त्या डोळ्यांची
मला बघताच क्षणी
खाली मान घालणाऱ्या
त्या एकटक लाजरेपणाची
कवी - शिवभक्त विश्वनाथ बोडखे पाटील
भांगापुरकर
