उन्हात ते सुकलेले
सकाळच्या पहारी
पुन्हा बहरलेले
रंग बदलणारे
फुपाखरांसोबत
नेहमीच खेळणारे
वाऱ्यांची झुळूक आली म्हणजे
सुळकून हातातून सुटणारे
मनास मोहणारे
त्यात घरकटून राहणारे
जणू कायमचेच त्यासोबत
सहवास करणारे
असे फुल ते गुलाबाचे
जणू पहिल्याचं प्रीतीचे
प्रेमात हळव्या होकाराचे
आणि आयुष्यभर
जवळीक राहणाऱ्या बंधाचे
कवी -शिवभक्त विश्वनाथ बोडखे पाटील
भांगापूरकर
