प्रत्येक पणाला विचार
खरच तू कुणासाठी
पूर्ण भरून गेलास ?
त्यातील प्रत्येक पान
प्रत्येक पानातील ओळ न ओळ
तुला एकच उत्तर सांगेन
अगं एक तूच तर आहेस
जिच्यासाठी आम्हाला हा
पांढऱ्याचं करून टाकतो काळ
तू यावर बिलकुल
विचार करू नकोस
माझ्या त्रासामुळे
दिलगिरीही व्यक्त करू नकोस
फक्त माझं प्रेम
निर्मळ किती आहे ,
एकनिष्ठ किती आहे
हेच रहस्य तू जाणून घे
कवी - शिवभक्त विश्वनाथ बोडखे पाटील
भांगापुरकर
