मी म्हणालो अंधार आहे (mi mhanalo andhar aahe) by ganesh puri



मी म्हणालो अंधार आहे 

आणि त्यानं समजलं अंधारच आहे 
त्याचा समजण्याचा दृष्टीकोन चुकीचा नव्हता 
आन माझा सांगण्याचा 
त्यानं समजलं माझ्याकड अंधारच राहिला 
आणि तो मला विसरला जसा मी कोणीही नाही 
पण खरं तर मी अंधार आहे असं म्हणालो
एकटा आहे असं नाही 
अंधार तर होताच पण सोबत होता उजेड जिद्दीचा 
मी अंधार चिरत चाललो होतो 
आणि तो समजला आहे मी अंधारातच 
तो आता विसरला मला पण मी नाही 
अंधाराला भेदत असता अनेक ठेचा खाल्ल्या 
आता तर सवयच झाली 
उजेड दीर्घकाळ नव्हता त्याच्यासोबतही 
पण जेव्हा त्याच्या आयुष्यात अंधार आला 
तेंव्हा कदाचित त्याला त्याची सवय नव्हती
आणि हो कदाचित त्याच्यात जिद्दी नव्हती

गणेश पुरी  सिमनगावकर
gspindiablogs@gmail.com





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने