अखेर कुठपर्यंत ...
सीमा ,मर्यादा,क्षमा,अहंकार,अपमान,विवंचना
दूर व्हावं वाटत या सगळ्यांपासून अगदी दूर
कुठपर्यंत सहन करायचं जगणं गुलामीतलं
बांध फुटणार कधीतरी मनातला आणि होणार विध्वंस
काही दिवसांनी पुन्हा सुरळीत होणार सार आणि
हळूहळू मनाच्या बांधावर असच काही पुन्हा साचणार
आयुष्यभर सतावत राहतील बोचत राहतील
खिळ्यासारख्या बोलण्याच्या चेष्टेच्या सुया
अशा घडीला आपलेच साथ देत नाहीत कधी
तर परक्यांकडून काय आशा सुखाची
ते तर देतील त्रास हसतील आणि टिंगल उडवतील
तरीही मी राग सांभाळत होतो अन अखेर....
अखेर सबुरीचा बांध पुन्हा तुटला उद्रेक झाला रागाचा
आपल्यांची आणि दुसऱ्यांची मन मी पुन्हा दुखावली
थोड्या वेळाने पुन्हा भानावर आलो आणि
काही दिवसांनी पुन्हा सुरळीत होईल याची वाट पाहू लागलो
परंतु मला माहित आहे पुन्हा उद्रेक काढण्यासाठी
कोणीतरी हिरव्या जखमांवर मीठ चोळणार
अखेर कुठपर्यंत...
गणेश पुरी सिमनगावकर
gspindiablogs@gmail.com
gspindiablogs@gmail.com
