दहा वर्षांपासूनची दोस्ती आज अनोळखी होती
ती आज उंच होती माझ्या पोहचण्यापेक्षा
वेळ बदलला आणि काळ ही बदलला होता
तीन पाहूनही न पाहिल्यासारख पाहिलंक्सक्स
मला कळलं तीचं मन काय म्हणतंय
तीच काहीच चुकल नाही जर ती विसरली
पण माझं काय मी का आठवतोय तिला आजही
मावळणाऱ्या सूर्याला कोणी हात जोडत का
मग ती मला विसरली यात नवल काय
नाहीतरी माझं काही वेगळं आहे का त्या सूर्यापेक्षा
आतातर पुन्हा मैत्री करण जमणार नाही पण
मी प्रयत्न करतोय तुला विसरण्याचा
हा लवकरच मी ही असाच विसरेन तुला वाचन देतो
गणेश पुरी सिमनगावकर
gspindiablogs@gmail.com
