दंगलीत (dangalit) by ganesh puri



जीवनाला लागलेला होता काळोख
दिवस कालचा जणू  झालेला होता  काळ
मी तसाच होतो फाटके कपडेही तसेच होते
मी रडत होतो आणि डोळे डबडबलेले  होते आजही

रक्त सांडत होते  वाहत होता वारा
दूरच कुठेतरी पाण्याचा चालत होता फवारा
आग लागली होती पाणी पडत होते
मी  रडत होतो आणि डोळे डबडबलेले होते आजही

कुठेतरी हळूच लहान मुलाचा  आवाज येत होता रडण्याचा
कुठेतरी जवळ आवाज येत  होता घर फोडण्याचा
कुत्रे ते रोडवर आजही झोपलेले होते
मी रडत होतो आणि डोळे डबडबलेले होते आजही

कुठेतरी आई जोराने फोडत होती हंबरडा
आणि  समोर पडलेला होता मृत मुलगा
देहाचे ढिगारे जळत होते
मी रडत होतो आणि डोळे डबडबलेले होते आजही

कुठेतरी अश्रूंचा धूर होता कुठेतरी पूर होता लोकांचा
कोणीतरी कुठे  झाडत होता गोळ्या
विस्कटलेले प्रत्येक काडतुस जमिनीवर पडत होते
मी रडत होतो डोळे डबडबलेले  होते आजही

कोणी पळत होते जळत होते  कोणी
अर्ध्याच्यावर देह घरामध्ये सडत होते भितीपोटी
प्रश्न प्रत्येकाकडे होता  उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते
मी रडत होतो डोळे डबडबलेले होते आजही

गणेश पुरी  सिमनगावकर
gspindiablogs@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने