बघताच दिसे पहा कसे चांदणे हे नभातले
सुगंधाची गुलाबाशी बरोबरी हि कशाची
बनणार जोडी कशी हि गुलाब धोताऱ्याची
पाहता तुला उठतो हा बघ गलबला मनातला
समजावुनी परी मी मोह रोखतो आतला
असेल जरी शुभ्र मी तरी मागणी न माझी
बनणार जोडी कशी हि गुलाब धोताऱ्याची
शोधतो मी ती मैत्री आज या जगातली
धरून रोष मनी मी मुठ झाकली आतली
करत होतो तुझी पण पर्वा आता न कुणाची
बनणार जोडी कशी हि गुलाब धोताऱ्याची
गणेश पुरी सिमनगावकर
gspindiablogs@gmail.com
