भ्रमर



गुलाब फुलला बगिचात

आवडले  ते फुल गुलाबाचे खुष झालो मनात
प्रेम जडले त्या भोवती
जुळत होती प्रीती गुलाब भोवऱ्याची
या प्रीतीला नजर लागली कुणाची
प्रेमात विघ्न पडले अन् फुल त्याने तोडले
कोण कुठचा तो राजपुत्र
हक्क त्यावर त्याचा आधीचा
प्रेम संपले आता दुखः झाले मनात
नियम निसर्गाचा मजलाही पडला लागु
आज इथ तर उद्या तिथे प्रेम शोधतो
मी दुखः विसरुनी आनंद शोधतो

गणेश पुरी  सिमनगावकर
gspindiablogs@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने