दुष्काळ




आन नाही रं घरात तरी पेरलं हे धानं
पैकं नव्हत जवळ म्हणू काढलं व्याजानं
मनी धरला रं भाव तुझा नाही केला हेवा ‍‍‍‍‍‌
का केलास रं घात मह्या पांडुरंगा देवा ॥धृ॥

पैकं जोडून जोडून लगीन पोरीचं म्या केलं
उभं धान शेतातलं जन्माआधीच का  मेलं
आली नाही दया तुला न वाजवतो पावा
का केलास रं घात मह्या पांडुरंगा देवा  ॥१॥

झोप न्हाई आता मला पाणी बरसत नाही
जणू देव इंद्र मह्यावं कोपलाच हाइं
कर पांडुरंगा काही घे हाकेला तू धावा
का केलास रं घात मह्या पांडुरंगा देवा  ॥२॥

मैतर सरजाचा पहा आज राहतुया उपाशी
नाही टाकाया रं त्याला त्याला आज वैरण मह्यापाशी
सगळं उदास उदास का गाऊ तुझा गोडवा
का केलास रं घात मह्या पांडुरंगा देवा  ॥३॥

गणेश पुरी  सिमनगावकर
gspindiablogs@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने