झाली अन्यायावर मात
रजत राजा एक फक्त
अशा शिवबाचा शिवबाचा शिवभक्त ॥१ ॥
रायरेश्वराच्या मंदिरात
घेऊन सवंगड्याची साथ
घेतली स्वराज्याची शपथ
अशा शिवबाचा शिवबाचा शिवभक्त ॥२॥
ज्यानं केला गनिमी कावा
दुष्टावर घातला घावा
झाले दुश्मन ज्याला त्रस्त
अशा शिवबाचा शिवबाचा शिवभक्त ॥३॥
जयान ठेवली सादही जान
परस्त्री मातेसमान
अशा आदर्श एकच फक्त
अशा शिवबाचा शिवबाचा शिवभक्त ॥४॥
ज्यानं व्यसन नाही केलं
जनतेला जीवन वाहीलं
ध्यानात घ्या हो हि गोष्ट
अशा शिवबाचा शिवबाचा शिवभक्त ॥५॥
असा आजही गाजावाजा
नाही होणार असा एक राजा
ज्यानं जागवलं भगवं रक्त
अशा शिवबाचा शिवबाचा शिवभक्त॥६॥
गणेश पुरी सिमनगावकर
gspindiablogs@gmail.com
gspindiablogs@gmail.com
Tags:
गणेश पुरी च्या कविता

